Home Featured News 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर, चार भारतीयांचाही समावेश

100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर, चार भारतीयांचाही समावेश

0

वृत्तसंस्था
न्यूयॉर्क दि.२७– जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत चार भारतीय महिलांचा सहभागी आहे. यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य, आयसीआयसीआय बँक प्रमुख चंदा कोचर, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ आणि एचटी मीडियाच्या अध्‍यक्षा शोभना भारतीया समावेश आहे. फोर्ब्स मासिकाने तयार केलेल्या 100 सर्वात प्रभावशाली यादीत भट्टाचार्य 30 वे, कोचर 35 व्या शॉ 85 व्या आणि भरतिया 93 स्थानावर आहे. तसेच फोर्ब्सच्या यादीत भारतीय वंशाची इंद्रा नूई(पेप्सि‍को प्रमुख) आणि पद्मश्री वॉरिअर (सिस्कोच्या प्रमुख तंत्रज्ञान व्यूहरचना अधिकारी) यांचाही समावेश आहे. यात पहिल्या क्रमांकावर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मॉर्केल आहे.

Exit mobile version