महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा

0
94

भंडारा दि.21 : महाराष्ट्र चेंबर  ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील उद्योग, कृषीसंलग्न उद्योग, वाहतूक, वीज बिलात सवलत, विदर्भात पर्यटन प्रोत्साहन योजना तसेच कोविड-19 परिस्थितीमुळे उदभवलेले प्रश्न आदि विविध मुद्दासंदर्भात या शिष्टमंडळाने चर्चा केली.

निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहिर करावी तसेच नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी. पर्यंत न्यावा लागतो, त्याच्या जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी. असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार व्हावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. बियाणे, खते आणि किटकनाशके खरेदीमध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या या संदर्भातील प्रकरणांना तातडीने न्याय मिळावा यादृष्टीने स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी हिताच्या त्यांच्या या भूमिकेचे यावेळी स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. चेंबरचे  अध्यक्ष, श्री.संतोष मंडलेचा आणि  महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, आशिष पेडणेकर,.करुणाकर शेट्टी, सागर नागरे आदी उपस्थित होते.