Home महाराष्ट्र सनातनच्या आश्रमात २००८-०९ दरम्यान २९०० कंडोमचा पुरवठा!

सनातनच्या आश्रमात २००८-०९ दरम्यान २९०० कंडोमचा पुरवठा!

0

वृत्तसंस्था
पणजी/ मुंबई दि.१: – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा कट सनानत या संस्‍थेने रचल्‍या आरोप केला जात असून, संस्‍थेचा साधक असलेला समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यामुळे गोव्‍यातील गोव्यातील रामनाथी क्षेत्रात असलेला सनातनचा आश्रम आठ दिवसात बंद करा, अन्‍यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा स्‍थानिक ग्रामस्‍था केला असून, जानेवारी 2008 ते नोव्हेंबर 2009 या काळात या आश्रमामध्‍ये आरोग्‍य विभागाने 2900 कंडोमचा पुरवठा केल्याचा दावाही सनातनविरोधी आंदोलनाचे नेते सौरभ लोटलीकर यांनी केला आहे. या बाबत त्‍यांनी आरोग्‍य विभागातील दस्‍तऐवज पोलिसांकडे दिले आहेत.

सरकारी रुग्णालयाच्या पत्राच्या आधारावर लोटलीकर यांनी हा आरोप केला आहे. सनातन संस्थेत ही साधना कसली असते?, आश्रमात एवढे कंडोम कशासाठी? असा सवाल करत त्यांनी सनातनच्या कार्यावर संशय व्यक्त केला आहे. हा आमच्याकडील लेखी पुरावा आहे. हे पत्र सरकारी रुग्णालयाचे असून ते पोलिस स्टेशनमध्ये सादर केले आहे. यात सर्व माहिती आहे, असेही सौरभ लोटलीकर म्हणाले
सनातन संस्थेचे मुख्यालय आणि आश्रम गोव्यातील रामनाथी क्षेत्रात आहे. ते आश्रम आठ दिवसात बंद करा, असा अल्टीमेटम ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गोवा सरकारकडे आश्रम बंद करण्याची मागणी केल्याचेही सौरभ लोटलीकर म्हणाले. राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक संस्था आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लवकरात लवकर सनातन संस्थेवर बंदी घालायला हवी, अशी आग्रही मागणी लोटलीकर यांनी केली आहे.

Exit mobile version