
अदानी ग्रुपचे जॉईंट प्रेसिडंट संजय कोठा यांच्या हस्ते उदघाटन
कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींगतर्फे पायोनियर या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे चार व पाच एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल एक लाख ५० हजार रुपयांची रोख बक्षीसे, प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
केआयटी कॉलेज येथे होणाऱ्या या स्पर्धेत मध्यवर्ती स्तरावर अभिव्यक्ती (संशोधन पेपर सादरीकरण) व प्रकल्प (प्रकल्प सादरीकरण) या दोन स्पर्धा ऑनलाईन होणार आहेत.चार एप्रिल रोजी स्पर्धेचे उद्घाटन आहे. यासाठी अदानी ग्रुपचे संजय कोठा व आयएसटीई, महाराष्ट्र- गोवा विभागाचे प्रभारी चेअरमन डॉ. रणजित सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभिव्यक्ती या मध्यवर्ती संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धेत आंतरशाखीय दृष्टीकोन अवलंबिला आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयएसटीई, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई व शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहेत.
आयएसटीईचे स्डुटंड चॅप्टर चेअरमन म्हणून दिविजा भिवटे हिची नियुक्ती केली आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून ग्रंतेज ओतारी व सहसमन्वयक म्हणून अभिजीत पाटील काम पाहत आहेत. केआयटीचे चेअरमन भरत पाटील, व्हाइस चेअरमन सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले, संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.