Home महाराष्ट्र कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला यश मिळालं, पण बहुमत नाही

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला यश मिळालं, पण बहुमत नाही

0
कल्याण, दि. २ – कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरुवातीच्या कलामध्ये बहुमत मिळणार असं दिसत असतानाच शिवसेनेला बहुमताने हुलकावणी दिली असून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला ५२, भाजपाला ४२, मनसेला ९, काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला २, एमआयएम व बसपाला प्रत्येकी १ व अपक्षांना ९ जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपा व शिवसेनेची युती झाली नाही तर मनसेची भूमिका मुख्य ठरणार आहे. आता भाजपा अथवा शिवसेना मनसेला सोबत घेऊन मॅजिक फिगर गाठते की भाजपा व शिवसेना एकत्र येऊन प्रचंड बहुमताची सत्ता स्थापन करतात हा कळीचा प्रश्न आहे.
एमआयएमने अनपेक्षीतरित्या यश मिळवले असून एमआयएमने ७ जागा लढवल्या आणि त्यापैकी एका जागेवर विजय मिळवत प्रथमच कल्याण डोंबिवलीत खातं उघडलं आहे.

Exit mobile version