नाशिक दिनांक 11 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यानंतर स्मारकाच्या परिसरात असलेल्या नर्सरीचे उद्घाटनही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, स्मारकाच्या संशोधन अधिकारी तथा व्यवस्थापक पल्लवी पगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, पोलीस निरिक्षक बी. एच. मथुरे आदीसह स्मारकातील कर्मचारी उपस्थित होते.