Home महाराष्ट्र दी बर्निंग बसः धावत्या बसने पेट घेतला

दी बर्निंग बसः धावत्या बसने पेट घेतला

0

गोंंदिया- आज रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास तिरोडा आगाराच्या धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली.

तिरोडा आगाराची बस आज प्रवासी घेऊन गोंदियाच्या दिशेने निघाली होती.  मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात येताच या बसगाडीने अचानक पेट घेतला. वाहक व चालकाच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग शार्टसर्किमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात अशा प्रकारे एसटी बसने पेट घेतल्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी, असे बोलले जात आहे. यामुळे परिवहन विभागातील अधिकाऱी सुद्धा आता निष्काळजी झाल्याची चर्चाही घटनास्थळी होती.

Exit mobile version