Home महाराष्ट्र देशाने आता शरद पवारांना राष्ट्रपती बनवावे- राहुल बजाज

देशाने आता शरद पवारांना राष्ट्रपती बनवावे- राहुल बजाज

0
मुंबई- शरद पवारांसारखा नेता पंतप्रधान बनू शकला नाही हे देशाचे दुर्देव आहे. पण वेळ अजून गेली नाही. ते केवळ 75 वर्षाचे आहेत. आता देशाने पुढील राष्ट्रपती म्हणून शरद पवारांना निवडावे अशी मागणी ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात पर्दापण केले आहे. यानिमित्ताने आज मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 10 डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या समारंभात ज्या प्रमाणे सर्व विरोधकांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे आजच्या मुंबईतील समांरभाला सर्व विरोधी पक्षातील नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सर्वच नेत्यांनी पवारसाहेबांच्या कार्याचे कौतूक केले. पवारसाहेबांबद्दल आम्ही पामर नेते काय बोलणार असाच सर्वांचा सूर होता.
राज्यपाल सी. विद्यासागर राव, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, उद्योगपती मुंकेश अंबानी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक बडे नेते मंचावर उपस्थित होते.
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. दरम्यान, पवारांनी आज सकाळी 9 ते 1 या वेळेत आपल्या चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांची शुभेच्छा स्वीकारल्या. पवार आज मुंबईतील दोन कार्यक्रमात सहभागी होतील. यासोबतच बारामती व पुण्यातही पवारांच्या पंचाहत्तरीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version