Home महाराष्ट्र बिबट्याच्‍या चामड्याची पूजा, शिक्षकांसह चौघे रंगेहाथ जाळ्यात

बिबट्याच्‍या चामड्याची पूजा, शिक्षकांसह चौघे रंगेहाथ जाळ्यात

0
गडचिरोली – बिबटयाची शिकार कातडे अवैधरित्या बाळगणाऱ्या चार जणांना वनाधिकाऱ्यांनी एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथून अटक केली. हे चौघे चामड्याची पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्‍याची विधी करत होते, अशी माहिती वन विभागाच्‍या पथकाला मिळाली आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे या चौघांमध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या दोन शिक्षकांचाही समावेश होता.
संजय महादेव देशपांडे, शरद रामचंद्र दोहतरे हे दोघेही घोटसूर येथील राहणारे. तर, संतोष आगलावे (राजुरा) व किसन देवकर (गडचांदूर जि.चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. आज चारही जणांना अहेरी न्यायालयामध्‍ये हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्वांना 5 जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली.

Exit mobile version