Home महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली

बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली

0

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश

 मुंबई-ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारनं गुरुवारी उठविली असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी आपण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही केले होते. अखेर केंद्र सरकारने आपली मागणी मान्य केली असून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली आहे. त्याबद्दल केंद्र सरकार व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार.

शेतकरी बैलांची काळजी घेतात. त्यांना प्रेमाने सांभाळतात. शर्यतीसाठी धावणा-या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते. तरीही शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याची अत्यंत चुकीची तक्रार केली जात होती. त्याच्या आधारावर यापूर्वीच्या कॉंग्रेस आघाडी सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. या बंदीमुळे शेतक-यांमध्ये नाराजी होती. बंदी उठवावी म्हणून काही ठिकाणी शेतक-यांनी आंदोलने केली होती. ग्रामीण भागातील या पारंपारिक लोकप्रिय खेळावरील बंदी उठवावी अशी शेतक-यांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर मा. रावसाहेब पाटील दानवे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला व त्याला यश आले आहे.

 

Exit mobile version