Home महाराष्ट्र गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – विनोद तावडे

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – विनोद तावडे

0

अलिबाग दि.२४ छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सर्व जगापुढे यावा, जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर रायगड यावा, या उद्देशाने रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वैभव आणि इतिहासाची साक्ष असलेले गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने किल्ले रायगड व पायथा पाचाड येथे रायगड महोत्सवाचे आयोजन 21 ते 24 जानेवारी,2016 या कालावधीत करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सांगता समारंभात श्री.तावडे बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार भरतसेठ गोगावले, आमदार विनायक मेटे, आमदार मनोहर भोईर, युवराज संभाजीराजे छत्रपती, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते. तर या सांगता समारंभाचे अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

Exit mobile version