
गोंदिया,–राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘स्थापना दिन’ साजराकरण्याचा निर्णय घेतला आहे. तसे शासन परिपत्रक 1 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता सर्व महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये त्यांचा ‘स्थापना दिवस’ साजरा केला जाणार आहे.मानवी जीवनात ‘जन्मदिवस’ साजरा करण्याला मोठे महत्व आहे. लहान मुलांसोबत मोठे देखील दरवर्षी वाढदिवस साजरा करतात.बदलत्याकाळानुरुप समाजोपयोगी कार्य करुन जन्मदिवस साजरे केले जात आहे. जन्मदिवस हे केवळ साजरे करण्यापुरते मर्यादित राहत नसून मागीलवर्षीचा आढावा व पुढील भविष्याचे ध्येय ठरविणे हा उद्देश असतो. याच उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील ‘स्थापना दिन’ साजरेकरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आपल्या गाव, शहर विकासाची धुरा सांभाळणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांचीस्थापना केव्हा झाली, याची कल्पना बहुतांशांना नसते.ते ती सर्वांना व्हावी. संबंधित अधिकारी व कर्मचार्याना या दिनानिमित्त नवा उत्साह मिळावा,या उद्देशाने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महानगर पालिका, नगर पालिका, नगरपंचायतीने ज्या दिवशी त्यांची स्थापना झाली त्यादिवशी ‘स्थापना दिवस’ साजरा करण्याचे परिपत्रक 1 सप्टेंबर रोजी काढले आहे. स्थापना दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन त्याचाखर्च आपल्या स्वनिधीतून करावा लागणार आहे.