भाजप नेत्यांनीच शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला; अजित पवारांचा दावा

0
19

नागपूर- मविआ सरकार असताना भाजप नेत्यांनीच भुखंड घोटाळा प्रकरणी चीआयएल दाखल केली होती. त्यांनीच एकनाथ शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर राज्य सरकारचा वचक न राहिल्याने सभागृहाच्रूा परिसरात स्वच्छता दिसून येत नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटणार असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घालत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दिवसभर आंदोलन करण्याची शक्यता आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एकही इंच जागा देणार नाही, असा ठराव करुन मोकळे झाले आहेत. तर महाराष्ट्र सरकार अजूनही गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जशी त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडत आहे तशी भूमिका आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का मांडत नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
जयंत पाटलांवरील कारवाई अयोग्य
गेली 32 वर्षे भवनाचे सदस्य असणाऱ्या जयंत पाटील यांचे बोलणे सर्वांनी पाहिले आहे. सरकारच्याबद्दल अनेकदा अशी वक्तव्यस केली गेली आहे. मात्र सत्ताधारी सोयीचे वागत आहेत. आम्ही सभागृहात का नाही हे थोड्या वेळात ठरवू असे सांगताना अजित पवार म्हणाले की छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्य हे मुंबईचे महापौर, माजगावचे 10 वर्षे आमदार होते. त्यांच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यामुळे इवढा मोठा गोंधळ करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी हा शब्द मुंबईबद्दल वापरला आहे, प्रवीण दरेकर यांनीही असाच उल्लेख केला होता असेही अजित पवारांनी म्हटले आहे. यांची लोक बोलली की सगळे योग्य आणि आम्ही बोललो तर गोंधळ घालायचे हे चुकीचे असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

महागाई, बेरोजगारी, मराठवाडा आणि विदर्भ यांचा विकास यासवर बोलाण्यासाठी हे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. मात्र तरीही दिक्षा सालियान, पुजा चव्हाण सारखे मुद्दे काढून दुयऱ्याच मुद्यावर चर्चा सुरू आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.सरकारविरोधात काही सुरू आहे, त्याला बगल देण्यासाठी हे सर्व विषयाला फाटे फोडले जात आहे, असा आरोप अजित पवारांनी म्हटले आहे.