Home महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत

0

मुंबई, दि. 26 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

विधानपरिषद कामकाज

विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मि. झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80.60 टक्के होती.

विधानसभा कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89% होती.

Exit mobile version