Home महाराष्ट्र तुमचाही पानसरे-दाभोळकर करू- सुभाष देसाईंना अज्ञातांची धमकी

तुमचाही पानसरे-दाभोळकर करू- सुभाष देसाईंना अज्ञातांची धमकी

0
कोल्हापूर- कोल्हापूरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुभाष देसाई यांना सोमवारी एका निनावी पत्राद्वारे गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा, अशा आशयाचा मजकूर लिहित देसाईंना धमकी देण्यात आली आहे.
कोल्हापूरातील देवी महालक्ष्मीबाबत एक लेख लिहल्यामुळे देसाईंना ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर देसाई यांनी जुना राजवाडा पोलिसांत धमकी दिली आहे. कोल्हापूरचे एसपी प्रदीप देशपांडे यांनी या घटनेची दखल घेतली चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून देसाई यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे.
याबाबतची माहिती अशी की, डॉ. सुभाष देसाई यांनी कोल्हापूरातील प्रसिद्ध देवी महालक्ष्मीबाबत नुकताच एक लेख लिहला आहे. या लेखात महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती विष्णूपत्नी नसून, शिवपत्नी आहे असे म्हटले आहे. मात्र, हा लेख प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी दुपारी देसाईंना एक निनावी पत्र आले.

Exit mobile version