
सोलापूर : फुटजवळगांव ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कडे पैसे नसल्यामुळे जिल्हा परिषद सोलापूर यांनी एक महिन्यामध्ये कॅमेरे दुरुस्त करून द्यावे जर कॅमेरे दुरुस्त नाही झाले तर सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर येथे पुनम गेट समोर भ्रष्टाचार विरोधी समिती बहुजन क्रांती सेना व अनेक संघटनेच्या माध्यमातून भीक मांगो आंदोलन दिनांक २९ सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने भिक मांगो आंदोलन सोलापूर जिल्हा परिषद येथे करण्यात येणार आहे. फुटजवळगांव ग्रामसेवक समीर शौकत शेख यांना दिनांक 19/07/2023 रोजी माहिती अधिकाराखाली फुटजवळगांव ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरे ची माहिती मागणी केली होती त्यांनी दिनांक 14,8,2023 रोजी तांत्रिक कारणामुळे सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याची खोटी माहिती दिली जिल्हा परिषद चे मुख्याधिकारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी शासकीय फंडातून रक्कम उपलब्ध करून द्यावी अन्यथा भ्रष्टाचार विरोधी समिती बहुजन क्रांती सेना व अनेक संघटनेच्या माध्यमातून भीक मांगो आंदोलन छेडण्यात येईल.