Home महाराष्ट्र खडसेंचे मंत्रीपद काढा, काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

खडसेंचे मंत्रीपद काढा, काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

0

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कनेक्शन प्रकरणी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. सायबर हॅकर मनीष भंगाळे यांनी खडसे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने ही याचिका आज (30 मे) स्विकारली असून त्यावर 6 जून रोजी सुनावणी होणार आहे. खडसे-दाऊद कनेक्शनची सीबीआयमार्फात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनीष भंगाळे यांनी केली आहे.

दुसरीकडे, याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्‍टमंडळाने राज्यपाल सी विद्यासागर राव यांची सोमवारी भेट घेतली. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी काँग्रेसने यावेळी केली आहे.

Exit mobile version