Home महाराष्ट्र भाजपा ओबीसी बहुजनांना दाबण्याचा प्रयत्न करतेय-जानकर

भाजपा ओबीसी बहुजनांना दाबण्याचा प्रयत्न करतेय-जानकर

0
विशेष प्रतिनिधी
परळी- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्‍त बीड जिल्ह्यातील  पांगरी येथील गोपीनाथ गडावर आज शुक्रवारी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. गोपिनाथ मुंडे यांच्‍यावर प्रेम करणा-या हजारो चाहत्‍यांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी यावेळी माध्‍यमांशी बोलतांना “ओबीसी बहुजनांना दाबण्याचा प्रयत्न भाजपा करतेय हे आज दिसत आहे, पण यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीने काय केले? ह्यांच दिसतेय त्यांचे दिसत नव्हते एवढाच फरक आहे.” असा टोला जानकर यांनी लगावला.स्व.मुंडे साहेब गेल्यापासून भाजपमध्ये ओबीसी बहुजनावर सातत्याने अन्यायच केला जात आहे यात शंकाच राहीली नाही,असेही म्हणाले.भाजपमधील ओबीसी बहुजनांना मात्र आपला काळ वेळ आणि भविष्य टिकवून ठेवण्यासाठी जागृत होण्याशिवाय पर्याय नसल्याचा अंदाज त्यांच्या बोलणयातून व्यक्त होतांना दिसून आला.
.

Exit mobile version