Home महाराष्ट्र जि.प अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर,गोंदिया एसटी महिला तर भंडारा एससी प्रर्वगासाठी राखीव

जि.प अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर,गोंदिया एसटी महिला तर भंडारा एससी प्रर्वगासाठी राखीव

0

मुंबई, दि. १० – राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालय़ात जाहीर झाली आहे.राज्यातील 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत.तर गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषदांच्या पुढच्या अडीच वर्षाच्या कार्याकाळासाठी सुध्दा अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली.यामध्ये गोंदिया जिल्हा परिषद एसटी महिला राखीव तर भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे एससी प्रर्वगासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात सलग दोनदा महिला अध्यक्ष राहणार आहेत.

 कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?

 अनुसूचित जाती – भंडारा, अमरावती .

अनुसूचित जाती महिला राखीव – हिंगोली, नागपुर

 अनुसुचित जमाती महिला – नंदुरबार ,ठाणे, गोंदिया,

 अनुसूचित जमाती – वर्धा, पालघर

 नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओबीसी ) -अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे

 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ओबीसी ) – जळगांव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ,

 सर्वसाधारण प्रवर्ग महिला – सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम,

 सर्वसाधारण प्रवर्ग – जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली

 यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला , वाशीम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील. पालघरचे जुलै 2017 पासून तर भंडारा, गोंदिया चे डिसेंबर 2017 पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे 2017 मार्च मध्ये निवडणूक झाल्यानंतर होणार आहे.

Exit mobile version