Home महाराष्ट्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे सादर केलेल्या...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे सादर केलेल्या डी.एस्सी प्रबंधाचा शताब्दी सोहळा

0

लंडन येथे पार पडली ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संग्रहालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपीः इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ डी. एस्सी प्रबंधासह दुर्मिळ लेख आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन

लंडन येथील भारतीय उच्चायुक्तातर्फे भारत भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन

मुंबई, दि. १५ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे १९२३ ला सादर केलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपीः इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या डी.एस्सी प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे, लंडन स्थित अभ्यासक आणि अनिवासी भारतीय श्री. गंगावणे, लॅरी क्रामेर, अध्यक्ष आणि कुलगुरू लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लॉर्ड निकोलस स्टर्न, आयजी पटेल प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नमेंट अँड को-चेअर इंडिया, डॉ. रुथ कुट्टुमुरी, को-चेअर इंडिया ऑब्झर्वेटरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. मनिषा करणे, सुजीत घोष, उपउच्चआयुक्त, भारतीय उच्चआयुक्तालय, डॉ. शंतनू सिंह, संशोधक, इंडिया ऑब्जर्वेटरी, डॉ. सुप्रिया कामथ, डॉ. नियथी कृष्णा, श्रीमती एलिजाबेथ रायन आणि मानस गोयल यांच्यासह विविध मान्यवर आणि लंडन आणि भारतातून ६४ संशोधक उपस्थित होते. १३ आणि १४ एप्रिल २०२४ या दोन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान, प्रघाड ज्ञान आणि समकालीन संशोधन आणि आर्थिक धोरणांशी त्यांची प्रासंगिकता यावर शंशोधक आणि धोरणकर्त्यांना या परिषेदेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

❖ विविध विषयांवर सादरीकरण

दोन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन्स टू इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म’, ‘कास्ट अँड सोशल जस्टीस’, ‘इंटरसेक्शनल इनइक्वॅलीटीज्’, ‘आंबेडकर्स व्हिजन ऑन एज्युकेशन, लिटरेचर अँड कल्चर’ अशा चार सत्रात विविध संशोधकांनी त्यांच्या विषयांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने ‘डॉ. बी. आर. आंबेडकर नॉनकन्फर्मिस्ट इकॉनॉमिस्ट’, ‘द इकॉनॉमिक्स ऑफ कास्ट सिस्टीम’, ‘रेलेव्हंस ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स मॉडेल ऑफ नॅशनलायझेशन ऑफ एग्रीकल्चर लँड’, ‘द रोल ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन सस्टेनॅबल अँड इन्क्ल्युझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ इंडिया’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरः आर्किटेक्ट ऑफ इंडियन कान्स्टीट्यूशन’, ‘रोल ऑफ डॉ. भीमराव आंबेडकर इन सस्टेनिंग सोशल जस्टीस इन इंडिया’, ‘अंडरस्टँडींग आंबेडकर बीयॉण्ड रिझर्वेशन’, ‘फॉरगॉटन हिस्ट्रीज ऑफ रॅसिलाईज कलोनिअल नेटवर्क्स ऑफ डोमेस्टिक वर्कर्स इन साऊथ इंडिया’, ‘इंडियन वुमेन एट क्रॉसरोड्स’, ‘डॉ. बी. आर. आंबेडकरः अ फेमिनिस्ट वॅनगार्ड इन द फाईट फॉर वुमेन्स इमॅनिसीपॅशन’, ‘इंटरसॅक्टींग आयडेंटीज्’, ‘रोल ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन वॉटर मॅनेजमेंट पॉलिसी’, ‘डॉ. आंबेडकर्स व्हिजन अँड रेजिलेंस ऑफ दलित लिटरेचर अँड कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन’, ‘रिडींग, रिरीडींग अँड अंडरस्टँडींग आंबेडकर्स लिटररी आर्किटेक्टॉनिक्स इन द टाईम्स ऑफ म्यूटंट डेमोक्रसी’, ‘डॉ. आंबेडकर्स इंटरसेक्शनल नरेटिव्ह ऑन लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर’ अशा विषयावर संशोधक आणि प्राध्यापकांनी सादरीकरण केले. परिषदेच्या समारोपीय सत्रासाठी माल्दोवाच्या माजी पंतप्रधान नतालिया गॅव्रिलिटा, लॉर्ड मेघनाथ देसाई, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, इंडो ब्रिटीश ऑल पार्टी पार्लियामेंटरी ग्रुप चेअरचे विरेंद्र शर्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

❖ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शन

विशेष म्हणजे या परिषदेच्या दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संग्रहालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपीः इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या डी.एस्सी प्रबंधासह बाबासाहेबांची दुर्मिळ पत्रे, लेख आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जुने ऐतिहासिक दस्तऐवज संग्रह वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी आणि संशोधकांसाठी विशेष प्रयत्न करून दोन दिवसासाठी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी रूपीः इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या प्रबंधाची मूळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्तलिखित पत्र, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये विद्यार्थी दशेत असताना डॉ. आंबेडकर यांची उपस्थिती पत्र, हजेरीपट त्याचबरोबर भारतातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अभ्यासासाठी येणारे भारतीय विद्यार्थी यांना आवश्यक असणारी मदत करण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पत्रव्यवहार हे सर्व जुने आणि दूर्मिळ दस्तऐवज प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

❖ लंडन येथील भारतीय उच्चायुक्तातर्फे ‘भारत भवन’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन

लंडन येथील भारतीय उच्चायुक्तातर्फे ‘भारत भवन’ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या माध्यमातून अध्ययन आणि संशोधनाचे महत्वपूर्ण कार्य हाती घेण्यात आले असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच अंबाडवे, मंडणगड येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचाही आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टिकोनातून साकारलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीवरही त्यांनी प्रकाश टाकला. या जयंती अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे, अनिवासी भारतीय श्री. गंगावणे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. तत्पूर्वी शिष्टमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराला भेट देण्यात आली.

Exit mobile version