Home महाराष्ट्र शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा – नरेंद्र मोदी

शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा – नरेंद्र मोदी

0

पुणे, दि. 25 – यापूर्वी शहरीकरण हे संकट मानले जायचे, परंतु त्याकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचा शुभारंभ दिमाखदार सोहळयात शनिवारी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलात झाला. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप, सचिव स्वाधीन क्षत्रिय महापालिका आयुक्त कुणालकुमार यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version