मुंबई- पुढील दोन महिन्यात राज्य विधान सभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने राज्य शासनाला पत्र देवून बदलीस पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.त्या अनुषंगाने शासनाने पावले उचलली असून बदलीस पात्र असणाऱ्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्यांची यादी आज गृह विभागाने जारी केली असून त्यात पोलिस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.