Home महाराष्ट्र बंगल्यांसाठी नव्या मंत्र्यांची धावाधाव

बंगल्यांसाठी नव्या मंत्र्यांची धावाधाव

0

मुंबई – शपथविधीनंतर खातेवाटपासाठी लॉबिंग करावे लागलेले नवे मंत्री आता मनासारखी दालने आणि बंगले मिळावेत, म्हणून धावाधाव करत असल्याचे चित्र आहे.

गेले वर्षभर मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लावून बसलेल्या अनेक संभाव्य आमदारांपैकी दहा जणांचा शपथविधी झाला. एकाला पदोन्नती मिळाली. त्यामुळे या अकरा जणांनाही आपणास हव्या त्या खात्यासाठी जोरदार लॉबिंग करावी लागली होती. खात्यासाठी लॉबिंग संपते न संपते तोपर्यंत आता या नव्या मंत्र्यांना मनासारखी दालने व बंगले मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

नव्या मंत्र्यांपैकी जवळजवळ सर्व मंत्र्यांना मंत्रालयाच्या नवीन इमारतीत दालन हवे आहे. यासाठी त्यांनी शपथविधी उरकल्यानंतरच आपल्या विश्‍वासू व जाणकार कार्यकर्त्यांना मंत्रालयात नवीन इमारतीत कोणत्या मजल्यावरील कोणते दालन रिकामे आहे, शेजारी कोणत्या मंत्र्याचे दालन आहे, हे पाहण्यास सांगितले होते.

Exit mobile version