सकल धोबी समाज आरक्षण,न्यायिक समिती कार्यकर्त्यांचे नाशिक येथे पार पडले प्रशिक्षण शिबिर

0
156

नाशिक,दि.०५ः महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण,न्यायिक समितीच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर व राज्य कार्यकारणीची बैठक नुकतीच हॉटेल न्यू हॉलिडे प्लाझा, नाशिक येथे राजेंद्रशेठ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीत साधकबाधक चर्चा करण्यात आली.तसेच न्यायव्यवस्थेवर मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीला अखिल भारतीय धोबी महासंघाचे, राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया,एकनाथराव बोरसे(राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष,ABDM),प्रा.सदाशिव ठाकरे शिरपूर,सनत वाढई गोंदिया,सुधीर पाटोळे पुणे,ॲड.अतुल बच्छाव छ.संभाजीनगर,प्रा.पंढरीनाथ रोकडे,शाम कदम पुणे यांच्यासह राज्यातील न्यायिक समितीचे सर्व विभागीय व जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.
बैठकिच्या पहिल्या सत्रात न्यायिक समितीचे आतापर्यंत झालेले काम जसे न्यायालयीन लढा व शासन दरबारी (बार्टी व RGI ई. )संदर्भात झालेले काम व सादर केलेले पुरावे आणि पुढे करावयाची आरक्षण संदर्भातील महत्वपूर्ण कामे, समितीच्या पुढील योजना ई. विषयांची सखोल माहिती व कायदेशीर बाबी महाराष्ट्रातील धोबी समाजाचे न्यायालयीन प्रमुख अंँड.अतुल बच्छाव यांनी दिली.दुसऱ्या सत्रामध्ये सदाशिव ठाकरे शिरपूर यांनी कार्यकर्ता समाज संघटनेचे वैभव या विषयावर कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य विषयी सांगताना आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यायचे असेल तर शिस्तप्रिय व ध्येयाने प्रेरित असलेला कार्यकर्ता हा समाज संघटनेचे वैभव असतो हे सांगतानाच आदर्श कार्यकर्त्यासाठी आवश्यक गुण व पाळावयाची पथ्ये याविषयी माहिती दिली.तिसऱ्या सत्रात सुधीर पाटोळे पुणे यांनी आरक्षण न्यायिक समितीमध्ये गोपनीयतेचे महत्व या विषयावर आपले सविस्तर मत व्यक्त केले. अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकृष्णकुमार कनोजिया यांनी समाजाच्या विकासासाठी प्रगतीसाठी व आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी संघटना व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी का आवश्यक असते याविषयी आपले मत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात या न्यायिक समितीचे सर्वेसर्वा समाजाचे आधारस्तंभ राजेंद्रसेठ आहेर यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने समाज हितासाठी काम करण्याचे आव्हान करतानाच मी आरक्षण विषयक व समाजाच्या हिताच्या कामांसाठी सदैव आपणा सोबत आहे व राहीन असे आश्वासन दिले. एकनाथराव बोरसे यांनी संघटनेचा इतिहास व संघटनेत कार्यकर्त्यांचे महत्त्व सांगितले.सनत वाढई यांनी न्यायालयीन लढ्याचा इतिहास व स्वर्गीय फाले गुरुजी व इतर समाज बांधवांचे आरक्षणाच्या लढाईतील योगदानाबदद्ल माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.डाँ. पंढरीनाथजी रोकडे संभाजीनगर यांनी केले.तर आभार योगेश रोकडे,नाशिक यांनी मानले.