मुंबईतील उद्योजक समीर शाह यांचा प्रशंसा प्रमाणपत्राने सन्मान

0
10

मुंबई-महाराष्ट्र – मुंबईच्या प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक, समीर शाह यांना भारत सरकारच्या वतीने साकीनाका मुंबई येथील पांचतारांकित हॉटेल मारिओटमध्ये आयोजित सिमपॉजियम व भारतीय पोस्ट यांच्यात करार कार्यक्रम अंतर्गत 2024-2025 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पोस्टल वाढीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रशंसा प्रमाणपत्राने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या एस एम इंटरप्रायजेस या कंपनीने त्यांच्या शून्यातून विश्व उभारण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहे.

समीर शाह यांच्या कामकाजामध्ये नावलौकिक खोदला असून त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतला आहे. ते गरीब आणि होतकरू व्यक्तींच्या मदतीला सदैव तत्पर असतात. मुस्लिम अल्पसंख्यक समुदायात त्यांच्या योगदानामुळे त्यांचा सत्कार केला जातो, तरीसुद्धा त्यांनी अमली पदार्थ विक्रीविरुद्ध एक ठाम भूमिका घेतली आहे आणि समाजात नशामुक्तीसाठी सतत प्रयत्नशील आहेत.

त्यांच्या कामाच्या सर्व स्तरांवर प्रशंसा होत असून, समीर भाईजान यांना शासनाच्या पोस्ट विभागात प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन सर्वत्र सुरू आहे. समीर शाह यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे आणि त्यांच्या मृदुभाषित व मनमोहक व्यक्तिमत्वामुळे समाजात एक सकारात्मक परिवर्तन घडत आहे.

समीर शाह यांना “गोल्डमॅन” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या यशामागे त्यांची अर्धांगिनी मरियम बेगम यांची महत्त्वाची साथ आहे. शाह म्हणतात की, त्यांच्या यशात त्यांचं योगदान अनमोल आहे.त्यांची अद्वितीय धाडसाची आणि आकर्षक कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर चर्चा का विषय आहे, ज्यामुळे ते देशभक्त समाजसेवक आणि उद्योजक असा आदर्श बनले आहेत.