
पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर
गोंदियाचे खेमेंद्र कटरे यांना नागपूर विभागाचा ग.त्र्य.माडखोलकर पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 24 : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 – बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सन २०२२ वर्षाकरीता नागपूर विभागाचा ग.त्र्य.माडखोलकर पुरस्कार हा वरिष्ठ पत्रकार खेमेंद्र कटरे यांना जाहीर झालेला आहे.खेमेंद्र कटरे यांना यापुर्वी २००७,२०१७ मध्ये सुध्दा हा पुरस्कार मिळालेला आहे.गोंदिया जिल्ह्यात तिसर्यांदा पुरस्कार मिळवणारे ठरले आहे.महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत असून ते साप्ताहिक बेरार टाईम्सचे संपादक आहेत.कटरे यांनी यापुर्वी नवराष्ट्र,सकाळ व पुण्यनगरी वृतपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
2021, 22 व 23 च्या पुरस्कार निवडीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत पत्रकार पराग करंदीकर, संदीप भारंबे, रवींद्र बेडकींहाळ, जितेंद्र दोशी,स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, सईद अन्सारी, चंद्रकांत शिंदे, निलेश खरे, सम्राट फडणीस व संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.गणेश मुळे यांचा समावेश होता.
या तीन वर्षाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींचे नावे पुढीलप्रमाणे.उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 2022 व 2023 निकाल