Home महाराष्ट्र ‘त्या’ 10 कोटींचा माझ्याकडे पूर्ण हिशेब : प्रीतम मुंडे

‘त्या’ 10 कोटींचा माझ्याकडे पूर्ण हिशेब : प्रीतम मुंडे

0

नवी दिल्ली : मुंबईच्या टिळकनगरमध्ये जप्त करण्यात आलेली 10 कोटींची रक्कम ही वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची आहे, त्याचप्रमाणे या रकमेचा पूर्ण हिशेब असल्याचा दावा भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि खासदार प्रीतम मुंडे या वैद्यनाथ को. ऑप. बँकेच्या संचालिका आहेत. या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. जप्त रोकड आणि बँकेचे तपशील तपासून पाहिले जाणार आहेत. या कामात मदतीसाठी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची दहा कोटींची रोकड एका शाखेतून दुसऱ्या शाखेत नेली जात होती. त्या रकमेचा पूर्ण हिशेब आहे, असे प्रीतम मुंडे यांनी सांगितलं. गुरुवारी रात्री मुंबईच्या टिळकनगरमध्ये 10 कोटी 10 लाखांची रक्कम जप्त केली गेली. बँक मॅनेजर आणि इतर दोन जण ही रक्कम कारमधून नेत होते. त्यावेळी ही कारवाई केली गेली.

Exit mobile version