Home महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या समाधीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

शिवछत्रपतींच्या समाधीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

0

रायगड दि.२५-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आज सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.फडणवीस यांनी यावेळी छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो असल्याचे सांगितले. आम्हाला शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.

महाड येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी येथे छत्रपतींचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्ठीत पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि काही वेळ त्याठिकाणी थांबून शिवरायांचे स्मरण केले. त्यानंतर रायगड संवर्धनासंदर्भातील बैठकीत ते सहभागी झाले.

Exit mobile version