Home महाराष्ट्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीसाठी समिति गठीत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीसाठी समिति गठीत

0

सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तसेच अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार यारगट्टी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे या कुलगुरु निवड समितीचे सदस्य असतील.मंगळवारी (दि २८) डॉ काकोडकर यांचेसह समितीच्या सदस्यांनी राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.
विद्यमान कुलगुरु प्रो वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मे 2017 रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती गठित केली आहे.

Exit mobile version