Home महाराष्ट्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

0

मुंबई,दि.24:-भारतातील नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षिततेची योजना म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षाविमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले असून यायोजनेत जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी महावितरणकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजनांचा कालावधी प्रत्येकवर्षासाठी 1 जून ते 31 मे असा राहणार आहे. विमा राशीची रक्कम प्रत्येकी रुपये 2 लाख एवढी आहे. दोन्हीयोजनांसाठी राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आवश्यक आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट 18 ते 70 वर्षे आहे. यात कर्मचाऱ्याने केवळ रु.12/- एवढा वार्षिक विमा हप्ता भरायचा असून कर्मचाऱ्यांस अपघात झाल्यास त्याला दोन लाखपर्यन्त विमा रक्कमनुकसानभरपाई म्हणून मिळेल.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत कर्मचाऱ्याला रु. 330/- एवढा वार्षिक विमा हप्ता भरावयाचा असून यायोजनेमध्ये वयाची अट 18 ते 50 वर्षे आहे. या कालावधीत कर्मचाऱ्याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यासत्याच्या अवलंबितास रु. 2 लाख इतकी रक्कम देय आहे.या दोन्ही योजनांची सविस्तर माहिती महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in यावर उपलब्ध असूनकर्मचाऱ्यांनी योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Exit mobile version