Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी भंडारी यांनी केली जलयूक्त आणि शेततळे कामाची पाहणी

जिल्हाधिकारी भंडारी यांनी केली जलयूक्त आणि शेततळे कामाची पाहणी

0

हिंगोली, दि. 12 : लघुसिंचन (जलसंधारण) विभाग आणि कृषि विभागामार्फत कळमनुरी तालूक्यातील मसोड गावात जलयुक्त शिवार अभियान आणि राष्ट्रीय फलोत्पादान अभियानातंर्गत झालेल्या कामांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी भेट देवून पाहणी केली.यावेळी आमदार संतोष टारफे, जिपचे सभापती विजया पतंगे, तहसीलदार श्रीमती गोरे, लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे अभियंता ए. आर. अशरफी, तालूका कृषी अधिकारी श्री. कल्याणपाड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी भंडारी यांनी आज कळमनुरी तालूक्यातील मसोड येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सिमेंट नाला बांधची पाहणी केली. सदर नाला बांधचे काम भौतिकदृष्ट्या पुर्ण झाली आहे. या नाला खोलीकरणांची लांबी 220 मीटर तर रुंदी 10 मीटर असून साठवण क्षमता 8.10 टीसीएम आहे. यावेळी भंडारी यांनी नाला खोलीकरण पक्के खडकापर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना संबंधीतांना दिल्या. या नाला खोलीकरणामुळे खरीप आणि रब्बी हंगामासाठी शाश्वत सिंचन उपलब्ध होऊन पाणी पातळीत देखील वाढ होण्यास मदत होईल.
तसेच राष्ट्रीय फलोत्पादान अभियानातंर्गत सामुहिक शेततळ्याची देखील जिल्हाधिकारी भंडारी यांनी पाहणी करुन सदर कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवाची उपस्थिती होती.

Exit mobile version