Home महाराष्ट्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण मिळावे-खासदार नाना पटोले

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण मिळावे-खासदार नाना पटोले

0

नवी दिल्ली-08 : मराठा समाजाला इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी अशी मागणी गोंदिया व भंडारा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर श्री.पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रात मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टया कमजोर आहे म्हणूनच, या समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. मराठा समाजाने आपल्या मागणीसाठी दिनांक ९ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मोर्चाचे आयोजन केले आहे.
मराठा समाजात बहुतांश लोक गरीब आहेत, या समाजाचे मागासपण दूर होण्यासाठी या समाजाला इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी श्री. पटोले यांनी या निवेदनात केली .

Exit mobile version