Home महाराष्ट्र एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे राज्यपालांचे आदेश

एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे राज्यपालांचे आदेश

0
मुंबई,दि.06- एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत. मेहता यांची चौकशी करण्याची समंती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मागण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रकाश मेहता आमदार असल्याने लोकायुक्तांकडून चौकशी होण्याअगोदर राज्यपालांची संमती आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी संमती देण्यासाठी राज्यपालांना विनंती केली होती.
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.

Exit mobile version