दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार

0
14

औरगांबाद,दि.18- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबचे सूतोवाच केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पितृपक्षानंतर कुठल्याही क्षणी हा विस्तार होऊ शकतो. यामध्ये 6 मंत्र्यांचं खातं जाण्याची शक्यता आहे, तर प्रकाश मेहतांचं खातं बदललं जाऊ शकतं. तसंच एका मराठा मंत्र्याची तामिळनाडूच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर सहकारनगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दालनाचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. मराठवड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.