Home महाराष्ट्र अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध- मुख्यमंत्री

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध- मुख्यमंत्री

0

मुंबई : अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नसीम खान, अब्दुल सत्तार, अमित देशमुख, जोगेंद्र कवाडे, अमिन पटेल, कुणाल पाटील, बसवराज पाटील, चंद्रकांत रघुवंशी, कालिदास कोळंबकर आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, अल्पसंख्याक समाज जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत प्रगती साधू शकत नाही. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

Exit mobile version