Home महाराष्ट्र अर्थसंकल्प की कवीसंमेलन? विरोधीपक्षनेते विखे पाटील यांची टीका

अर्थसंकल्प की कवीसंमेलन? विरोधीपक्षनेते विखे पाटील यांची टीका

0

मुंबई,दि.०९- महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधीपक्षाने सडकून टीका केली आहे. निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘सुरुवातीला आम्हाला कळालेच नाही की अर्थसंकल्प आहे की कवी संमेलन? राज्याचा निराशाजनक अर्थसंकल्प असे अर्थसंकल्पाचे वर्णन विरोधीपक्ष नेत्यांनी केले आहे.सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नव्हते त्यामुळेच ते शिवाजी महाराजांचे नाव घेत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल मोठा असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या पीकाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी १२ तास वीज देण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिल्याचे विखे पाटील म्हणाले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेरो-शायरी आणि काव्यपंक्तीच्या केलेल्या पेरणीवर विखे पाटील यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले, ‘सुरुवातीला तर आम्हाला वाटले हा अर्थसंकल्प आहे की कवी संमेलन? ‘अर्थसंकल्प निराशाजनक असून सरकारने जनतेच्या हातात भोपळा दिला आणि सर्वांची पाटी कोरी केली आहे. ‘सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.”सातव्या वेतन आयोगाची कर्मचाऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. तरतुदीची घोषणा केलेली नाही.’ धनगर समाजाच्या आरक्षणाचा अद्याप कोणताही विषय सरकारच्या पटलावर नाही. फक्त अहिल्यादेवींचे नाव घेतले आहे.हे जुमलेबाजांचे हे सरकार आहे. ‘बेरोजगारीचे आकडे जनतेसमोर आणणे सरकारने बंद केले आहे. २ कोटी युवक-युवतींना रोजगाराचे आश्वसन दिले होते. २ लाख बेरोजगारांनीही रोजगार दिला नाही.आज सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे शेख चिल्ली के हसीन सपने असा उल्लेख केला.

Exit mobile version