Home महाराष्ट्र १९ फेब्रुवारीला ‘मुंबई-नागपूर-मुंबई’ विशेष रेल्वे

१९ फेब्रुवारीला ‘मुंबई-नागपूर-मुंबई’ विशेष रेल्वे

0

नागपूर – १९ फेब्रुवारी रोजी नागपूरसाठी ‘मुंबई-नागपूर-मुंबई’ ही विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे.
०१०१३ ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरुन मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. तर नागपूरला दुपारी तीन वाजता पोहोचेल. ही गाडी वडनेरा स्थानकात ११.२० वाजता पोहोचेल तर धमणगाव १२, फुलगाव १२.१६, वर्धाला १२.४५ला त्यानंतर नागपूरला तीन वाजता पोहोचेल.
त्याचदिवशी नागपूरहून मुंबईच्या दिशेनेही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी नागपूरहून रात्री ९.१५ वाजता सुटेल तर दुस-या दिवशी रात्री १.२० वाजता ही गाडी सीएसटी स्थानकात पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वडनेरा, धमणगाव, फुलगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल.

Exit mobile version