Home महाराष्ट्र हायवेवर विद्युत खांब पडला वीज कंपनीचे देखभालीकडे दुर्लक्ष

हायवेवर विद्युत खांब पडला वीज कंपनीचे देखभालीकडे दुर्लक्ष

0

शेखर भोसले/मुलुंड पूर्व,दि.24ः- येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर म्हाडा कॉलनीच्या नाक्यावर रस्त्यावरील एक विजेचा खांब मधोमध तुटून रस्त्यावर आडवा झाला. नवघर पोलिसांनी ताबडतोब घटना स्थळी येवून घटनास्थळाचा ताबा घेतला. वाहतूक काही वेळेसाठी रोखून विजेच्या खांबाचा तुटलेला भाग काढून बाजूला ठेवला. एमएसईडीसीएलच्या कामगारांनी येवून त्या खांबाचा वीजप्रवाह बंद केला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी वा नुकसान झाले नाही.परंतु वीज कंपनीने रस्त्यावरील सर्व विद्युत खांबांचे नियमित सर्वेक्षण करणे जरूरीचे आहे हेच या दुर्घटनेने सिद्ध केले आहे. अन्यथा भविष्यात विद्युत खांबा पडून मोठी दुर्घटना घडू शकते,आणि जीवितहानी देखील होवू शकते. एमएसईडीसीएलचे कर्मचारी नियमितपणे रस्त्यावरील विद्युत उपकरणांची (स्ट्रीट लाइट पोल, डीबी, फीडर पिलर, ई.) ची देखभाल करतात की नाही, हा प्रश्न याप्रसंगी दुर्घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी करीत नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version