Home महाराष्ट्र वडनेर बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिला ठार

वडनेर बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिला ठार

0

पुणे,दि.31 – अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या वडनेर बुद्रुक येथे बिबट्याने 70 वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेच्या शरीराचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आढळुन आले. राधाबाई कारभारी वाजे, असे मृत महिलेचे नाव आहे.आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास राधाबाई वाजे ही महिला घराच्या बाजुलाच शौचालयास जात होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत अतिशय निघृणपणे महिलेची शिकार केली. हा हल्ला ऐवढा भयानक होता की महिलेचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले पाहायला मिळाले आहेत. यामुळे वडनेर बुद्रुक परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Exit mobile version