Home महाराष्ट्र इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल- पृथ्वीराज चव्हाण

इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल- पृथ्वीराज चव्हाण

0

सातारा दि. १- जागतिक बाजारपेठेत कच्या तेलाचे दर कमी झाले असताना पेट्रोल व डिझेलमध्ये झालेली दरवाढ ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराड येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.
पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीमुळे महागाई वाढेल आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. विरोधात बोलणारे आता सत्तेत आल्यावर प्रत्यक्षात सामान्य जनतेला विसरले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Exit mobile version