विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील पाच कामगार आगीत होरपळले

0
175

अहमदनगर,दि.20ः- प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहविजनिर्मिती प्रकल्पाला लागलेल्या आगीमध्ये पाच ते सहा कामगार होरपळल्याची घटना आज सकाळी घडली. त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.आज शुक्रवारी सकाळी ११वाजेदरम्यान ही आग लागली. दोन ते आडीच तासानंतर १२ अग्नीशामक बबांच्या साह्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.विखे पाटील कारखान्यासोबत करारकरून गँमन इंडिया या  खासजी कंपनीने प्रवरा रिन्योएबल एनर्जी लिमिटेड नावाचा सह उर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामध्ये शुक्रवारी सकाळी  सकाळी ११ वाजेदरम्यान ३०० फूट उंचीवर काही कामगार वेल्डींगचे काम करत असताना वेल्डींगच्या ठिंणग्या खाली असलेल्या दगडी कोळसावर पडल्याने तो पेटला. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या बॉयलर गॅसने पेट घेतल्याने आगीने उग्र रूप धारण केलेल्या कामगाराना बाहेर पडणे मुश्किल झाल्याने ते या आगीमध्ये होरपळले. तर एकाने जीव वाचविण्यासाठी ३०० फुटावरून उडी टाकल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली.दरम्यान, संगमनेर,शिर्डी,राहाता,राहुरी,देवळाली,प्रवरा, श्रीरामपूर व कोपरगांव या ठिकाणाहून पाचारण केलेल्या अग्निशामक दलांनी तीन तासाच्या अथक परिश्रमानानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले.