यवतमाळ,दि.13 : पश्चिम घाटाचे क्षेत्र हे गुजरात ते केरळ अशा सहा राज्यात विस्तारले आहे. यात आपल्या राज्यातील २१३३ गावांमध्ये
केंद्रीय वनमंत्री तथा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पश्चिम घाटाच्या जैवधितता जोपासण्यासंदर्भात तसेच पश्चिम घाट इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्याबाबत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ३ नुसार आणि पर्यावरण संरक्षण नियम १९८६ उपनियम ३ नुसार केंद्र शासनास असलेल्या अधिकारानुसार पश्चिम घाटाचे पर्यावरण संवेदशनशील क्षेत्राचा मसुदा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्राने राज्याचे १७३४० चौ. किमी क्षेत्र अधिग्रहीत केले आहे. मात्र यातील २५७०.८८ चौ. किमी क्षेत्र वगळण्याबाबत राज्याने केंद्राला विनंती केली आहे. इको सेन्सेटिव्ह झोन महत्त्वाचा असून त्यामुळे जैव विविधता वाचणार परंतु राज्याच्या विकासात बाधा येऊ नये म्हणून औद्योगिक वसाहत व खनीज क्षेत्र ज्या भागात आहे, असे क्षेत्र वगळण्याची राज्याची मागणी आहे.
केंद्राच्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्राच्या १३ जिल्ह्याती