Home महाराष्ट्र आदिवासी विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता

आदिवासी विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता

0

मुंबई,दि.२७-राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून, ई-टेंडर पद्धतीने केलेल्या या खरेदीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचे एकाहून एक प्रताप समोर येत असल्याने फडणवीस यांच्यापुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.१० कंत्राटदारांनी निविदा भरल्या; पण एका विशिष्ट कंत्राटदारालाच कंत्राट मिळावे यासाठी अटी व शर्ती बदलण्यात आल्या. याबाबत काही कंत्राटदारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खरेदी प्रक्रियेबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशीचे आदेश दिले.

Exit mobile version