
औरंगाबाद, दि.28- सलग चौथ्या आठवड्यात खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पंतर्गत आज फेब्रुवारी 27 ला लोकसहभाग मोहीम संपन्न झाली. छावणी येथील लोखंडी पुलाच्या खाली 500 झाड लावण्यात आले तर 10 टन कचरा उचलण्यात आला.
मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा संकल्पनेतून साकारलेल्या ह्या मोहिमेला औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत छावणी बोर्ड औरंगाबाद, इको सत्त्व आणि वरोक ची साथ मिळाली आहे. चार आठवड्यापासून दर शनिवारी स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे.
ह्या शनिवारी मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोड, आदित्य तिवारी, अभिलाषा अगरवाल, अदिती पुजारी, मनपा स्वच्छता निरीक्षक असदूल्ला खान, इको सत्वची टीम आणि अन्य मनपा चे कर्मचारी सहभागी झाले.
श्री पाण्डेय ह्यांनी शनिवारी मनपा कर्मचारी आणि नागरिकांसोबत संवाद साधला आणि प्रत्येकाचे आभार मानले. ते म्हणाले की वृक्षारोपणासाठी नदीला पूरक असे झाडांची निवड केली जात आहे. छावणी स्थित इन्कम टॅक्स कार्यालयाची भिंतिचा बाजूला बांबू, वड, पिंपळ अशी झाडे लावून वॉकिंग ट्रॅक तयार करायचा आहे. त्यांनी पुढच्या आठवड्यात कलाकारांना आणि कला विद्यार्थ्यांना वाल पेंटिंग करण्यासाठी आवाहन केले.
एनजीओ लाईफ केअर, वेलकम शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था चे अझहर पठाण, श्रमिक बहुउद्देशीय विकास संस्था आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभाग नोंदवला.
शनिवारी दुपारी इको सत्व द्वारे पाणी आणि नदी पुनरुज्जीवन तज्ञ अश्विन परांजपेची मनपा स्वच्छता निरीक्षक आणि जवानांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे कार्यशाळा आयोजित केली. ह्या कार्यशाळेत नदिंचा महत्त्व, नदीचा आरोग्य तपासण्याचे घटक, खाम नदीचे पूनरुज्जीवणासाठी गरजेचे उपक्रम आदी मुद्यांवर चर्चा झाली.