
औरंगाबाद, दि.28- शहरातील क्रांतिचौक प्रभागात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या योजने अंतर्गत ५० लक्ष रुपये खर्चून सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. श्री जाधव यांचे घर ते श्री सहस्त्रबूधे यांचे घर तसेच अलाप अपार्टमेंट ते अक्षय इस्टेट पर्यंतच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख विजय वाघचौरे , उपशहरप्रमुख संजय बारवाल, रतन साबळे, प्रमोद ठेंगडे, महिला आघाडी उपजिल्हा संघटन अनीता मंत्री, प्रतिभा जगताप, शहर संघटक आशा दातार, उपशहरसंघटक देवयानी सीमंत, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, विभागप्रमुख सुधीर चौधरी, प्रा. संतोष बोर्डे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच याप्रसंगी शाखाप्रमुख पंकज वाडकर, उदय जैस्वाल, संजय तांबे, प्रशांत पिंपरीकर, सुनील खरात, दादाराव खरात, सागर वाडकर ,पंकज पाटील, आकाश गायकवाड, प्रशांत लकडे, सुनील काथार, राज जैस्वाल, संतोष खरात, गणेश पिंप्रिकर, प्रवीण लाहोटी, उदय वारे, रवी पाटील, रोहित सुर्यवंशी, लदनिया काका, हुरणेअप्पा, मारोती स्वामी, अतुल जोशी, श्री.छाबडा, अश्विनी गरगडे, संगीता भुजबळ, गुरबिंदर कौर बिंद्रा, मेधा पांडे, अनुराधा नीलेगावकर, विजया बारवाल, मनिंदर कौर छाबडा, सुनीता शेजुळ आदी शिवसैनिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.