
नांदेड-तमिलनाडु राज्यातील वेल्लोर जिल्ह्यात एका बीडी उत्पादकाने ‘गुरतेज’ नावाने बीडीचे उत्पादन बाजारात आणले असून त्या उत्पादनावर श्री गुरु गोबिंदसिंघजी यांचा फोटो बोधचिन्हाच्या रुपात वापरलेला आहे. यामुळे शीख समाजासोबतच शीख गुरु श्री गुरु गोबिंदसिंघ जी यांच्यावर आस्था ठेवणाऱ्या सर्वधर्मीय नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्या बीडी उत्पादकाचे जाहीर निषेध करीत असल्याची भावना पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता स. रवींद्रसिंघ मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. तसेच मोदी यांनी शोशल मिडीयाच्या माध्यमातून सुद्धा देशपातळीवर वरील विषयी आवाज़ उठवला आहे.
वरील विषयी रवींद्रसिंघ मोदी यांनी अधिक माहिती दिली की, तमिलनाडु राज्यातील वेल्लोर जिल्ह्यात एस. के. फजलानी नावाच्या एका बीडी उत्पादकाने बाजारात “गुरतेज” नावाने एक उत्पादन बाजारात आणले आहे. बीडीच्या बंडलावर त्याने शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी यांचा फोटो वापरला आहे. वरील प्रकरण तीन ते चार दिवसांपूर्वी निदर्शनास आले. वरील प्रकरण शीख समाजाच्या भावना दुखावणारे असे आहे. शिवाय गुरु गोबिंदसिंघजी यांच्यावर आस्था ठेवणाऱ्या सर्वधर्मीयांच्या भावनांना सुद्धा यामुळे ठेस पोहचली आहे. मागील दोन दिवसांपासून पंजाब पासून कर्नाटक पर्यंत अनेक संस्थानी आणि नागरिकांनी वरील विषयी आवाज़ उठवला असून वरील कृतिचा विरोध करण्यात येत आहे.
रवींद्रसिंघ मोदी यांनी वरील विषय सोशल मिडियाच्या माध्यमातून देशपातळीवर निदर्शनास आणून दिले. त्यांच्या ट्वीटर संदेशला चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास पाचशे रीट्वीट झाले आहे आणि सध्याही विषयावर मंथन व निषेध सुरु आहे. जवळपास पन्नास हजार लोकांनी ट्वीट वाचला आहे. जो पर्यंत त्या उत्पादकाविरुद्ध योग्य करवाई होत नाही तो पर्यंत लढा सुरु ठेवण्याचा निर्धार रवींद्रसिंघ मोदी यांनी व्यक्त केला आहे. वरील विषय केंद्र शासनाकडे तसेच तमिलनाडु शासनाकडे मांडण्यात येत आहे. तसेच स्थानिक सामाजिक क्षेत्रात सर्वांशी सल्ला करून विषय न्यायालयात प्रस्तुत करण्याचा विचार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.