1 कोटी 25 लाखांचा गुटखा; सुगंधित तंबाखू जप्त

0
39

लातूर– शहरातील गंजगोलाई परिसरातील प्रेम एजन्सी नाव असलेल्या दुकानावर आणि गोडाउनवर पोलिसांनी धाड टाकली. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या या धाडीत गुटखा, सुगंधित तंबाखुचा 1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी प्रेमनाथ तुकाराम गोरे व त्यांचे सहकारी तसेच शिवाजी मोहिते व सावकार यांच्याविरुध्द गांधी चौक पोलीस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माकोडे हे करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी व त्यांच्या विशेष पथकातील पोलीस अंमलदार पायजी पुट्टेवाड, सूर्यकांत कलमे, भागवत मामाडगे, बापू तिगीले, चंद्रकांत राजमाले, साहेबराव हाके, रायभोळे, ज्ञानेश्वर जमादार यांनी केली आहे.