Home मराठवाडा सरपंचाने नोटा उधळत आंदोलन केल्यानंतर पंचायत समितीचे बीडीओ तात्काळ निलंबित; गिरीश महाजनांकडून...

सरपंचाने नोटा उधळत आंदोलन केल्यानंतर पंचायत समितीचे बीडीओ तात्काळ निलंबित; गिरीश महाजनांकडून कारवाई

0

छत्रपती संभाजीनगर– फुलब्री तालुक्यातील सरपंच साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंवर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे.

दरम्यान या प्रकरणी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, हा निर्णय स्वागातार्ह आहे. मंत्री महाजन यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. मी उधळलेले पैसै मला वापस करावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. कारण हा सर्व पैसा माझ्या शेतकरी बांधवांच्या घामाचा पैसा आहे.

साबळेंचा आरोप काय?

शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून घेण्यासाठी फुलंब्री येथील सरपंचाने पंचायत समिती समोर पैसे उधळत अनोखे आंदोलन केले. विहिरीला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के मागत असल्याचा आरोप गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला आहे. तीच रक्कम मी येथे घेऊन आलो, आणखी रक्कम लागली तर शेतकऱ्यांसोबत जमा करून देतो, असा संतापही यावेळी सरपंच साबळे यांनी केला.

Exit mobile version