नांदेड /दि ९ –बरबडा येथे अधिकमासाचे औचित्य साधून…पांपटवार परिवार – कौटुंबिक स्नेहमीलन स्व. गंगाधाररावजी पांपटवार माध्य. विद्यालय मालेगाव रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटनीस डी.बी.जांभरुणकर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.माधव वटपलवाड , कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून आदरणीय प्रा.पी.जी.रुद्रवाड , जावाई प्रतिनिधी म्हणून माणीकराव बच्चूवार, दिलीप निजामपुरे यांनी स्थान ग्रहण केले होते.
एरव्ही लग्न समारंभ किंवा इतर वेळी संपूर्ण कुटुंबं एकत्र येते पण धोंड्याच्या महिन्या निमित्त संपूर्ण परिवार एकाच छताखाली येणे हि कदाचित पहिलीच वेळ.संपूर्ण परिवार एकत्र यावा, एकमेकांच्या भेटी व्हाव्यात, आपआपसातील जिव्हाळा,स्नेहभाव वाढावा जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा या उदात्त हेतू ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आव्हानाला प्रतिसाद देत दूर दूर वरून आप्त नातेवाईक आनंदाने सहभागी झाले. सर्व ताई व जावई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. व्याख्यान,विविध मनोगते,गीत संगीत, इ भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस (ग्रामीण)चे जिल्हा उपाध्यक्ष गजानन गंगाधरराव पांपटवार यांनी केले.
सूत्रसंचालन गजानन हरिहर पांपटवार यानी केलं तर आभार ज्ञानेश्वर पांपटवार यानी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी साईनाथ हरिहर पांपटवार,पांडुरंग पांपटवार, बालाजी पांपटवार,साईनाथ दत्तात्र्यय पांपटवार,विठ्ठल पांपटवार,गोविंद पांपटवार,संदीप पांपटवार,राजू पांपटवार यांनी प्रयत्न केले.