डॉ. स्नेहा सोनकाटे यांचे मोर्चा संदर्भात मार्गदर्शन

0
19

धाराशिव (प्रतिनिधी)-धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून एस. टी. आरक्षणापासून वंचित ठेवल्याबद्दल 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिववर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासंदर्भात डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी मार्गदर्शन केले.
24 नोव्हेंबर रोजी धाराशिव शहरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, जेष्ठ पत्रकार राजा वैद्य, अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, दिनेश बंडगर, संतोष वतने, सचिन शेंडगे, काकासाहेब सोनटक्के, प्रा. सोमनाथ लांडगे, गणेश सोनटक्के, नृसिंह मिटकरी, गणेश एडके आदी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी धनगर समाज एस. टी. आरक्षणासाठी लढत असला तरी समाजात मात्र ओबीसी म्हणूनच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या प्रत्येक चळवळीत धनगर समाज सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष दत्त बंडगर व लिंबराज डुकरे यांनी 30 नोव्हेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.